बाब्बो…. दोन शालेय विद्यार्थी रातोरात झाले करोडपती; लोकांनी लावल्या बँकेसमोर रांगा.

दिल्ली दि.16 सप्टेंबर – दोन शालेय विद्यार्थी रातोरात करोडपती झाल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे आपले बँक खाते (Bank account) तपासण्यासाठी लोकांनी बँकेच्या दारात गर्दी केली आहे.

(Babbo …. two school students became millionaires overnight; Queues in front of a bank planted by people.)

बिहारमधील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात तब्बल 960 कोटी रूपये जमा झाले. त्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली. तर अनेक लोक नरेंद्र मोदींनी खात्यात पैसे पाठवले का? ते पाहण्यासाठी बँकेसमोर तसेच सीएसपी सेंटरच्या (CSP center) बाहेर रांगा लावून उभे होत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जातात. त्यामुळे गुरूचंद्र विश्वास आणि असित कुमार हे गणवेशाचे पैसे बँकेत आले आहेत का ते पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी त्यांना समजले की, त्यांच्या खात्यावर कोट्यावधी रूपये जमा झाले आहेत.

ही बातमी तेथील लोकांना समजल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी असित कुमारच्या खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त तर गुरूचंद्र विश्वास याच्या खात्यावर 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. या दोन्हीही विद्यार्थ्यांची बँक खाते उत्तर बिहार ग्रामिण बँक (Bihar Gramin Bank) भेलागंज या शाखेची आहेत. तर या बँकेच्या शाखेचे शाखा व्यवस्थापक (Branch Manager) मनोज गुप्ता हे ही आश्चर्यचकित झाले. तर त्यांनी सांगितले की, दोन्ही मुलांच्या खात्यातील पैसे भरणे लगेच बंद करून खाती गोठवली आहेत. तर या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बिहारमध्येे बँक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. तर खगरियामध्ये एका तरूणाच्या खात्यात साडेपाच लाख रूपये जमा झाल्याचे प्रकरण अजून मिटले नाही. त्यातच या प्रकरणानंतर लोकांनी बँकेच्या समोर रांगा लावत आपल्या खात्यातील रक्कम तपासत आहेत. मात्र अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा मोठी खळबळ उडवून देणारा ठरत आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) 15 लाखांच्या आश्वासनावर मीम्सही बनवल्या जात आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!