तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईची झळ बसू देणार नाही – प्रा. ईश्वर मुंडे

किल्लेधारुर दि.१९ (प्रतिनिधी) आ.प्रकाश सोळंके, पंचायत समिती सभापती चंद्रकला हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, सर्व पं.स.सदस्य, तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवू परंतू पाणी टंचाईची झळ जनलेला बसू देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तालुक्यात तीव्र पाणी टंचाई – अधिकाऱ्यांची मनमानी अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे धारूर तालुकाध्यक्ष प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी तात्काळ तहसीलदार वंदना शिडोळकर, सोपान अकेले गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी गिरी व पाणी टंचाई विभागाचे श्री पवार यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील पाणी टंचाई सद्यस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना पाणी टंचाई कामास प्राधान्य देवून पाणी प्रश्न तात्काळ सोडवावित अशी विनंती केली. सध्या तालुक्यात ०३ ठिकाणी पाणी टँकर चालू असून ०२ ठिकाणीचे प्रस्ताव पंचायत समितीला दाखल झालेले आहेत. तसेच बोअर अधिग्रहणाचे ३० प्रस्ताव पंचायत समितीला आलेले असून त्यापैकी २० प्रस्ताव मंजूरीसाठी तहसिलदार यांचे कडे पाठवलेले आहेत. १० प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर आहेत. तहसिलदार यांचे कडे पाठवलेल्या २० पैकी १० बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. उर्वरीत प्रस्ताव तात्काळ मंजूर होतील. तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांच्या सरपंचांनी उपाययोजनांचे प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीला दाखल करावेत. त्यांचा पाठ परावा आम्ही करुन तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा केला जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांनी आवाहन केले आहे. यावेळी युवक कार्यकर्ते तानाजी नागरगोजे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस रतन शेंडगे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सटवा अंडील उपस्थित होते.