बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; धारुर77 तर केज 128, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.11 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4482 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1258 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3224 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; Dharur 77 and Kaij 128, see taluka wise statistics.)

आज सत्तावनाव्या दिवशी बीड तालुक्यात 310 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 188, आष्टी तालुक्यात 140 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 77 तर केजमध्ये 128 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-310, अंबाजोगाई-188, आष्टी-140, धारुर-77, गेवराई-75, केज-128, माजलगाव-88, परळी-58, पाटोदा-73, शिरुर-61, वडवणी-60 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या सध्या स्थिर दिसत आहे. दररोज येणारी आकडेवारी पेक्षा आता बरे होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण खोळंबले आहे. लसीकरण व फळ, भाजी विक्रेत्यांना दिलेली सुट यामुळे तुफान गर्दी वाढत आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 37,236 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 61,607 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यामध्ये 549 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 51,38,973 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 44,69,425 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5,90,818 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!