केजमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले.

केज दि.22 सप्टेंबर – केज शहरात कानडी चौकात मध्यरात्री 1 च्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

(Terrible accident in Kaij; An unidentified vehicle crushed the two.)

केज शहरात दि.22 बुधवारी पहाटे एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरुन जात असलेल्या तिघांपैकी दोन जण या अपघातात (Accident) जागीच ठार झाले. मृतात सुमित संदीपान सिरसाट (वय 18) व सुजित सुरेश राऊत (वय 20) यांचा तर विजयकुमार पांडूरंग घोळवे (वय 35) हा जखमीत समावेश आहे.

तिघे आपल्या दुचाकी क्र. एम.एच. 44 एम. 2303 वरुन जात असताना केज (Kaij) शहरातील कानडी चौकात अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. जखमी तरुणास शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची केज पोलिस (Police) पुढील तपास करत आहेत.

दरम्यान केज शहरातून राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी व 548 डी गेला असून मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे. यामुळे दिवसाही रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो. एकेरी वाहतूकीचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. सदरील रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!