बीड

Jarange Patil… बीड जिल्ह्यात उद्रेक… आमदार संदीप क्षीरसागरांसह जयसिंग सोंळके यांच्या घरावर हल्ला.

59 / 100

बीड दि.30 अॉक्टोंबर – Jarange Patil… मराठा आरक्षणाचा लढा आता आक्रमक रुप घेत असून बीड जिल्ह्यात याचा उद्रेक झाला. माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर Sandip Kshirsagar व बीडमधील जयसिंग सोळंके Jaysing Solanke यांच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला केला. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. (Jarange Patil… Outbreak in Beed district… Attack on house of MLA Sandeep Kshirsagar along with Jaisingh Sonalke.)

मनोज जरांगे पाटील Jarange Patil यांची प्रकृती ढासळल्यानंतर आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. बीड Beed जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटले. बीड परळी व सोलापूर धूळे महामार्गावर Highway टायर जाळून वाहतूक बंद करण्यात आली होती. तर माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके Prakash Solanke यांच्या घरावर हल्ला करुन जाळपोळ करण्यात आली. यानंतर माजलगाव नगर परिषद कार्यालयासह शैक्षणिक संकुल व पतसंस्थेला लक्ष करण्यात आले. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासह आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, धैर्यशिल सोळंके यांचे घर व काही दुकानांना आगी लावण्यात आल्या. तर पोलिसांच्या वाहनांची नासधूस करण्यात  आली आहे. दरम्यान उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण Maratha reservation मागणीला लागलेल्या हिंसक वळणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सदर उद्रेक सत्ताधारीकडून होत असल्याचा आरोप केला असून संतप्त जमावाने वेळीच उद्रेक थांबवावा नसता वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!