बीड कोरोना अपडेट; पहा आज कशी आहे जिल्ह्याची स्थिती.

बीड दि.2 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 258 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 9 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 249 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चार तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर इतर सर्व तालुके शुन्यावर आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज 9 आहे तर कालची संख्या 3 होती. आज संशयित रुग्णांची तपासणी 258 आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार सोमवारी 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2807 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 117 आहे.

दरम्यान, राज्याला आज कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या हजाराच्या खाली घसरली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज दैनंदिन मृत्यूसंख्या देखील कमी झाल्याने आशादायक चित्र आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची (active patients) संख्या 15 हजारांवर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 809 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1901 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 52 लाख 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.59 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!