अन आ. सतीश चव्हाण यांना झाली कार्यकर्त्यांची आठवण; धारुर महाविद्यालयात सहविचार सभा

किल्लेधारूर दि.२७- अगदी काही दिवसावर आलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक Election येताच गेली बारा वर्ष आमदार असलेल्या व तिसऱ्यांदा निवडणूकीतील संभाव्य उमेदवार असलेल्या विद्यमान आमदार सतिश चव्हाण #Satish Chavan यांना कार्यकर्त्यांची आठवण झाल्याचे काल येथील महाविद्यालयात झालेल्या सहविचार सभेच्या माध्यमातून दिसुन आले.
तब्बल सहा वर्षानंतर आ. सतिश चव्हाण #Satish Chavan यांनी कार्यकर्त्यांची बैठक सहविचार सभा म्हणून आयोजित केली. या सहविचार सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या समोर बोलण्याचा योग आ. सतिश चव्हाण यांना आला. या सहविचार सभेत पदवीधर असलेल्या मतदार किंवा कार्यकर्त्यांच्या भावना आ.चव्हाण जाणून घेतील असे वाटत असताना केवळ त्यांचेच विचार ऐकून घेण्याची वेळ उपस्थित असलेल्या पदवीधर व कार्यकर्त्यांवर आली. यंदा प्रथमच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीत बोलावण्यात आले होते. मंचावर मात्र प्राचार्यांसह महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पहिल्या रांगेत तर पक्ष प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी दुसऱ्या रांगेत दिसुन आले. तर काही प्रमुख कार्यकर्ते मंचावर अनुपस्थित दिसले. यावेळी मशिप्र मंडळाचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी कार्यकर्त्यांच्या स्वागत व व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे दिसुन आले. यामुळे निवडणूक Election पदवीधरांची की मंडळाची असा प्रश्न उपस्थितांना पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम, अर्थ व नियोजन सभापती जयसिंगभैय्या सोळंके यांच्यासह महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Satish Chavan