माझं गाव

व्यापारी क्षेत्रातील उगवता तारा निखळला ; तरुण व्यापारी गजानन डुबे यांचे निधन .

49 / 100

किल्लेधारूर दि.28 जुलै – व्यापारी क्षेत्रात अल्पावधीत उतूंग भरारी घेणारे 41 वर्षीय तरुण व्यापारी (businessman) गजानन रामचंद्र डुबे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज गुरुवारी सकाळी 8 वाजता निधन झाले . शहरातील व्यापारी क्षेत्रातील उगवता तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया येत आहेत.

कार्बन मोबाईल कंपनीच्या ( Karbonn Moboles ) माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात उत्कृष्ट वितरक म्हणून गजानन डुबे यांनी नावलौकिक मिळवला होता. गजानन डुबे यांनी विविध नामवंत उत्पादक कंपनी सोबत यशस्वी वितरक म्हणून व्यापारी क्षेत्रात दबदबा निर्माण केला. व्यापार क्षेत्रासह सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. आर्य वैश्य समाजाचे ते बीड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या अगदी तरुण व उमेदीच्या काळात झालेल्या अकाली निधनामुळे व्यापारपेठेत शोककळा पसरली आहे. सतत हसतमुख व समाजातील सर्व जातिय व धर्मिय मित्रांचा मोठा समुह त्यांनी जमवला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठभुमी या पोलिस ठाणेमागील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बीड24 परिवार डुबे कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

A rising star in the business sector emerged; Young businessman Gajanan Dubey passed away. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!