धारुर वगळता जिल्ह्यातील आठ कोविड सेंटर सुरु …. नायब तहसीलदार राहणार नियंत्रण अधिकारी.

बीड दि.30 मार्च – जिल्ह्यात मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूचे (Corona virus) संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात आठ ठिकाणी केअर सेंटर चालू केले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सदरील केअर सेंटर मध्ये संक्रमित रुग्णांच्या (Corona virus) तक्रारी असतील त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नायब तहसीलदारांचे नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यासाठी निर्देशीत केल्याचे जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आदेश दिले आहेत. धारुर (Dharur) तालुका वगळता इतर आठ ठिकाणी हे कोविड सेंटर (Covid care center) पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.
(Except Dharur, eight Kovid centers have been started in the district …. Deputy Tehsildar will be the control officer.)

नियुक्त नायब तहसीलदार यांनी त्यांना नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज करावे. आरोग्य विभाग व इतर विभागांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. कोणत्या प्रकारची हयगय अथवा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बीड तालुक्यातील पाच कोविड सेंटर यात समाविष्ट आहेत. श्री. सुरेंद्र डोके ,नायब तहसीलदार महसूल- 1 तहसील कार्यालय बीड, केअर सेंटर चे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वस्तीगृह बीड, मो. क्र. _ 94 22 7426 75 , श्री .संजीव राऊत, नायब तहसीलदार पुरवठा तहसील कार्यालय बीड, शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वस्तीगृह खंडेश्वरी बीड ,मो.क्र.94 21 31 3170, श्री. विनायक धावणे, नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय बीड, तंत्रनिकेतन मुलीचे वस्तीगृह खंडेश्वरी बीड ,मो.क्र. 80 87 51 42 49, श्रीमती लता शिरसाट, नायब तहसीलदार महसूल, तहसील कार्यालय बीड, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय बीड, मो. क्र. 96 89 85 41 31

श्री .प्रशांत जाधवर ,नायब तहसीलदार महसूल-1तहसील कार्यालय गेवराई ,कस्तुरबा गांधी शासकीय वस्तीगृह, गेवराई ,मो. क्र.91 68 49 54 81, श्री. प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार महसूल -1 तहसील कार्यालय आष्टी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वस्तीगृह आष्टी, मो. क्र.97 63 53 50 03,श्री .खेडकर शिवनाथ ,नायब तहसीलदार महसूल-1 तहसील कार्यालय शिरूर ,समाज कल्याण मुलींचे वसतिगृह शिरूर कासार, मो. क्र.99 22 6220 25 श्री.इंद्रजीत गरड, नायब तहसीलदार, निवडणूक तहसील कार्यालय पाटोदा, समाज कल्याण मुलींचे वसतिगृह पाटोदा ,मो. क्र.99 23 93 61 11 श्री अशोक भंडारी, तहसीलदार महसूल 2 तहसील कार्यालय माजलगाव, समाज कल्याण मुलीचे वस्तीगृह  माजलगाव, मो. क्र. 86 68 90 21 77 ,श्री. प्रकाश सिरसेवाड, नायब तहसीलदार महसूल 2 तहसील कार्यालय वडवणी, कस्तुरबा गांधी शासकीय वस्तीगृह वडवणी, मो. क्र. 94 22 56 04 68 श्री .लक्ष्मण धस नायब तहसीलदार महसूल-1 महसूल कार्यालय केज, समाज कल्याण मुलींचे वसतिगृह केज, मो. क्र.98 50 42 83 83, श्री. गणेश सरोदे ,नायब तहसीलदार महसूल- 2 तहसील कार्यालय अंबाजोगाई ,शासकीय नर्सिंग महाविद्यालय लोखंडी, मो. क्र.75 88 53 31 84, श्रीमती क्षितिजा  वाघमारे , नायब तहसीलदार महसूल-1  तहसील कार्यालय परळी ,समाज कल्याण मुलींचे वसतिगृह परळी ,मो. क्र.90 28 04 63 14  . उपरोक्त नियुक्त नायब तहसीलदार यांनी त्यांना नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज करावे. असे निर्देशीत केले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणू कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 18 97 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून दोन तीन व चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्य क्षेत्रात कोविड-19 (covid-19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे व ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने कोविड-19 (covid-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोविड -19 (covid-19) उपाय योजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांना घोषित केलेले आहे. त्यांना कार्यक्षेत्रातील कोविड -19 वर नियंत्रण यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात आता एकुण 15 कोविड सेंटर सुरु असून केवळ धारुर (Dharur) तालुक्याचे कोविड सेंटर अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. धारुर तालुक्यात आढळून येणाऱ्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची सोय 40 कि.मी. अंतरावर असणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरवर असल्यामुळे आरोग्य प्रशासनाला रुग्णांकडून बरेचवेळा सहकार्य मिळत नाही. गतवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देवून रुग्णांची प्रशंसा मिळवणारे धारुर येथील 100 खाटांचे कोविड सेंटर का सुरु करण्यात आले नाही याची माहिती मिळू शकली नाही. गेल्या दिवसात धारुर तालुक्यात 74 रुग्ण संख्या आढळून आलेली असून 74 ॲक्टीव रुग्ण आहेत. धारूर तालुक्याचा एकुण कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा हजारापर्यंत पोहोचला आहे. तर दि.19 पर्यंत मृतांचा आकडा 31 होता. तर तालुक्याचा मृत्यू दर 3.46% येवढा होता. येथील कोविड सेंटर सुरु करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!