धक्कादायक … मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच एसटी चालकाची आत्महत्या.

संगमनेर दि.21 सप्टेंबर – अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात एसटी बस चालकाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच या एसटी चालकाने आत्महत्या (Suicide) केल्याचे आज सकाळी समोर आले आहे.

(Shocking … ST driver commits suicide in a parked bus.)

संगमनेर (Sangamner Bus Station) बस स्थानकात बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. आज मंगळवारी (दि. 21) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. 14 बी. टी. 4887 क्रमांकाच्या पाथर्डी-नाशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने (Bus driver) बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. चालकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. या चालकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. प्राथमिक माहितीनुसार, कर्जाला कंटाळल्यामुळे एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कळते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!