धारुरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून व्हि.एस आटोळे रुजू; पाटील मुंबईला रवाना.

बीड दि.12 फेब्रुवारी – धारुर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदाेन्नती झाली असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. धारुर पोलिस ठाण्याचा पदभार (Dharur) सपोनि (API) व्हि.एस. आटोळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
( VS Atole joins Dharur as Assistant Inspector of Police; Patil leaves for Mumbai. )
राज्य प्रशासनाकडून दि.2 फेब्रुवारी रोजी राज्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याआदेशानूसार किल्लेधारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितिन दगडू पाटील यांची पदोन्नती (Promotion) होवून त्यांची पोलिस निरीक्षक म्हणून मुंबई (Mumbai) येथे बदली झाली आहे.
या आदेशात जिल्ह्यातील पाच सपोनिचा समावेश आहे. बीड पोलिस (Beed Police) दलातील सुभाष गणपत दासरवाड (पो.प्र.के. बाभळगाव), नितिन दगडू पाटील (मुंबई शहर), नितिन गजानन मिरकर (मुंबई शहर), अनिल लक्ष्मणराव गव्हाणकर (मुंबई शहर), आनंद केशवराव झोटे (मुंबई शहर) यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.
किल्लेधारूर पोलिस ठाण्यात चार महिन्यापुर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) नितिन पाटील यांची नियुक्ती झाली होती. येथील रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक (Police Inspector) पदाचा प्रभारी कार्यभार पाहणाऱ्या सुरेखा धस यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षक पदाचा प्रभार पाटील यांनी स्विकारला होता.
पाटील यांची पदोन्नती झाल्यामुळे येथे पदाचा पोलिस निरिक्षक मिळणार की पुन्हा प्रभारीच राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. काल धारुर पोलिस ठाणे प्रभारी म्हणून केज तालुक्यातील युसूफवडगाव येथून व्हि.एस. आटोळे यांची बदली झाल्याचे आदेश मिळाले. कालच त्यांनी धारुर पोलिस ठाण्याचा (Police station) कारभार स्विकारला असून पदोन्नतीवर बदली झालेले नितिन पाटील पदभार सोडून मुंबईला रवाना झाले आहेत.