धारुर घाटात पुन्हा भीषण अपघात; एक जागीच ठार.

किल्लेधारूर दि.18 सप्टेंबर – धारूर घाटात शनिवारी सकाळी सोलापूर (Solapur) कडून सिंमेट घेऊन जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन. एक्स. 4090 हा कठडा तोडून दिडशे ते दोनशे मिटर दरीत कोसळल्याची दुर्घटना (Accident) घडली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
(Another horrific accident in Dharur Ghat; Killed on the spot.)
राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र 548 सी वरील धारूर (Dharur) तेलगाव रस्त्यावर अवघड घाट (Ghat) आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे सकाळी साडेनऊ चे दरम्यान अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मिटर खोल कोसळला.
या अपघातात गाडीचा चालक पैंगबर पटेल हा जागीच ठार झाला. धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. या चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच चालकाचा मृत्यू झाला होता. धारूर घाटात (Dharur Ghat) नेहमीच घडणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकात भिती निर्माण झाली आहे.