“ओ काका आमचा फोटो काढा ना”…. मरीन ड्राईव्हवर घडलेली घटना

मुंबईः दि.१६- दोन दिवसाच्या अधिवेशनाचे सुप वाजले. सत्ताधारी आणि विरोधकात बरेच आरोप प्रत्यारोप झाले. या काळात मात्र सोशल माध्यमातून एक मजेशीर घटना व्हायरल झाली. ती म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या सोबत घडलेल्या एका घटनेची.
विधिमंडळाचे कामकाज आटपून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे आ. आशुतोष काळे (Ashutosh Kale) व इतरासंह सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्ह (marine drive) ला फेरफटका मारत होते. यावेळी अचानक भरणे यांना एका मुलांनी आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे फोटो, त्यांच्या जीवनातील अनमोल क्षण भरणे यांनी कैद केले. याच वेळी अचानक भरणे यांचा फोटो आ. आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी काढला. त्या नंतर मुलांना समजले की आपण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) मामा यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सोबत एक फोटो आपण पण काढुया अशी विनंती केली. त्यांच्या आनंदात भरणे मामा सहभागी झाले. एक वेगळीच घटना विधानसभेत भवनासमोर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरीन ड्राईव्ह (marine drive) वर घडली. सोशल नेटवर्किंग वर घटनेचा फोटो आणि नक्की काय घडले यासंदर्भात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. आमचा फोटो काढा म्हणत थेट राज्यमंत्र्यांच्या हातात फोन दिला. मुलांचा फोटो काढत असतानाचा दत्तात्रय भरणे यांचा फोटो विषयी मोठी चर्चा होत असून मोठेपणा मिळवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो अशा प्रतिक्रिया येत आहेत.