सर्वात मोठी बातमी ; उद्या बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे निर्देश.

मुंबई दि.29 जुन – आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून उद्या बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत.
( The biggest news; Governor directs to take majority test tomorrow. )
शिवसेना व एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा 11 जुलैपर्यंत पुढे ढकलला गेला. यामुळे आता राज्यात काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन होते. यातच काल मंगळवारी इतके दिवस शांत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एक्शन मोडमध्ये आलेले दिसून आले. फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली असून यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून उद्या दि.30 रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
यामुळे आता घडामोडीत ट्विस्ट आले असून सभागृहला सध्या अध्यक्ष नसल्यामुळे व उपाध्यक्षावर अविश्वास असल्यामुळे काय होणार याबाबत उत्सूकता वाढली आहे. त्यातच अशा परिस्थितीत कोर्टाचे द्वार चोविस तास आपल्यासाठी उघडे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सध्या तरी ठाकरे सरकारसमोर मोठे संकट असून सरकार पक्ष कोणती भुमिका घेणार याकडे लक्ष लागुन आहे.
बंडखोर आमदार मुंबईकडे परतणार
दरम्यान एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांनी कामाक्षी देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्या मुंबईत बहुमत चाचणीसाठी परतणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर इतर सर्व प्रक्रिया होणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गुवाहाटीहून निघून शिंदेसह बंडखोर आमदार मुंबईच्या जवळपास येण्याची शक्यता आहे. आजच बारा वाजण्याच्या सुमारास सर्व बंडखोर आमदार गुवाहाटी सोडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील
मुख्यमंत्री नव्हे तर भाजपच्या गोटात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही ठरणार आहे, एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या टीममधील सुमारे 5 आमदारांना मंत्रीपदही मिळणार आहे, ज्यांना शिंदे गटात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.