एपीआय माधूरी मुंडे एक लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; अन्य दोन कर्मचारीही जेरबंद.

गंगाखेड दि. 26 मार्च- अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका जणांकडून तब्बल 1 लाखाची लाच स्विकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे गुरुवारी दि.25 मार्च रोजी लाचलूचपत विभागाने (Anti-Corruption Bureau) सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक (Police Inspector) माधुरी मुंडे यांच्यासह तिघांवर कारवाई केली.

(API Madhuri Munde caught taking Rs 1 lakh bribe; Two other employees were also arrested.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारांच्या विरुद्ध अ‍ॅट्रासिटी अर्जामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्थानकावरील कँटीन चालवू देण्यासाठी तिघांनी पंचासमक्ष 1 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत 45 वर्षीय तक्रारदाराने तिघां विरोधात लेखी तक्रार अर्ज दिला. माधुरी महादेवराव मुंडे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक (Police Inspector), शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्र्यंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोलीस हवालदार ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस (Railway Police) स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे.

18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्याच्या पार्किंग जवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी 1 लाख रूपये लाच मागितली होती. यातील रेल्वे पोलीस हवालदार संजय त्र्यंबक भेंडेकर याने तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्वीकारले व ही रक्कम घेऊन तो पळून गेला. तक्रारदारांच्या विरुद्ध अ‍ॅट्रासिटी अर्जामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्थानकावरील कँटीन चालवू देण्यासाठी त्या तिघांनी पंचसमक्ष 1 लाखाच्या लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणात गंगाखेड येथे पोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा परभणी अँटी करप्शन ब्युरोचे (Anti-Corruption Bureau) पोलिस उपाधीक्षक भरत हुंबे, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक अमोल कडू, पो,ना. अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद पो.कॉ. सचिन धबडगे , सारिका टेहरे, चालक पो.ना. चौधरी यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!