एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीची निर्घून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद.

औरंगाबाद दि.22 मे – एकतर्फी प्रेमातून महाविद्यालय परिसरातून 200 फूट फरफटत ओढून नेत एका 19 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना शनिवारी औरंगाबाद शहरात घडली. भरदिवसा गजबजलेल्या देवगिरी महाविद्यालय परिसरात ही खळबळजनक घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेमुळे मात्र औरंगाबाद शहर हादरून गेले आहे.
ग्रंथी सुखप्रीत (कशीश) कौर प्रीतपाल सिंग (वय 19) ही विद्यार्थींनी बीबीए प्रथम वर्गात शिकत होती. शनिवारी एका युवकाने महाविद्यालयाच्या आवारातून तिला 200 फूट ओढत नेऊन तिचा गळा चिरत खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. ज्यांनी हा प्रकार पाहिला त्यांची देखील पळापळ झाली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेदांतनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही तपासून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.
अशी घडली घटना
महाविद्यालयाच्या परिसरात आरोपीने कशीशच्या दुचाकीची चावी आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपीने दुचाकीची चावी परत देण्यासाठी रचना कॉलनी भागातील कॅफेमध्ये मयत युवतीस बोलावले. याच ठिकाणी आरोपी आणि कशीश यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने कशीशला कॅफे समोरच्या चौकातून अक्षरशः ओढत रचनाकार कॉलनीच्या एका रिकाम्या प्लॉटवर नेले. या ठिकाणी तिचा गळा चिरला. कशीशची मैत्रीण ही त्या प्लॉटजवळ गेली असता तिच्यावरही शरणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कशीशच्या मैत्रीणीने तेथून पळ काढला.
दरम्यान कशीशच्या मैत्रिणीने तात्काळ फोन करून तिचा भाऊ हरप्रीतला घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर कशीशचा भाऊ हरप्रीतसिंग आपल्या वडिलांसह घटनास्थळी आला. त्यांनी लगेच कशीशला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. संशयित मारेकरी ने कशीशच्या गळ्यावर धारदार हत्याराने चार वार केले, त्यात कशीशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी चा शोध घेण्यासाठी वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या दोन टीम आणि गुन्हे शाखेची एक टीम रवाना करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप हे करत आहे. आरोपी हा एका गॅरेजमध्ये काम करतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना आरोपीची ओळख पटलेली आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिस शोध सुरु आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात 24 तासात खूनाचा हा तिसरा प्रकार असून या घटनेनंतर मात्र खळबळ माजली आहे. पोलिसांना परिसरातील सीसीटीव्हीत घटनेचे व्हिडीओ मिळाले. आरोपीची ओळख पटलेली असून शरणसिंग सेठी (20, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे. फरार आरोपीचा शोध पोलिस पथकाकडून सुरु आहे.
( The brutal murder of a 19-year-old girl out of one-sided love; Incident captured on CCTV. )