ठरलं… उद्यापासून एसटी बस प्रवास महागणार; तब्बल 17 टक्के दरवाढ.

पुणे दि.25 अॉक्टोंबर – एसटीच्या दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून उद्या मंगळवारपासून (दि.26 ऑक्टोबर) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होत असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

(It has been decided … ST bus travel will be more expensive from tomorrow; A whopping 17 percent increase.)

मागील काही काळापासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा फटका राज्यातील एसटी महामंडळाला बसत आहे. यामुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या (ST) या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. उद्या मंगळवारपासून (दि.26 ऑक्टोबर) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. दिवाळीच्या (Dipawali) तोंडावर होत असलेल्या दरवाढीमुळे प्रवाशांना फटका सहन करावा लागणार आहे.

कोरोना (Corona) काळामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस (ST bus) तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते. यासाठी राज्य परिवहन प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात एसटी तिकिटाचे दर सतरा टक्क्यांनी वाढणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!