राजकीय

Majalgoan Election माजलगावात होणार बहुरंगी लढत ; 64 जणांची माघार तर 34 जण रिंगणात.

69 / 100

माजलगाव दि.4 नोव्हेंबर – Majalgoan Election नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी 98 पैकी 64 उमेदवारांनी माघार घेतली असून 34 उमेदवार रिंगणात असणार आहेत. माजलगाव मतदारसंघात बंडखोरी कायम राहिल्यामुळे मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी होणार आहे.

229 माजलगाव मतदारसंघात विधानसभेच्या निवडणूकीसाठी 98 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. आज दि.4 नोव्हेंबर नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याच्या अंतिम दिनी यापैकी एकुण 64 उमेदवारांनी माघार घेतली असून 34 उमेदवार अंतिम लढतीच्या रिंगणात असणार आहेत. माजलगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून आली. यात नुकतेच शरद पवार गटात प्रवेश केलेले रमेशराव आडसकर यांच्यासह माधव निर्मळ, बाबरी मुंडे, प्रा. इश्वर मुंडे यांचा समावेश आहे. माजलगाव मतदारसंघात युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके, आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार मोहनदादा जगताप, अपक्ष म्हणून रमेशराव आडसकर, माधव निर्मळ, बाबरी मुंडे, वंचित आघाडीचे शेख मंजूर, प्रा.इश्वर मुंडे, यशवंत गायके, सादिक ईनामदार अशी बहुरंगी लढत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!