बीड जिल्ह्यात आज सर्वोच्च संख्या; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.29 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4902 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1470 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर  3432 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, राज्यात काल दिलासा मिळाला असून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसुन आली.

(Today’s Corona Update of Beed District; See Taluka wise statistics.)

आज चौरेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 320 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 215, आष्टी तालुक्यात 133 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 84 तर केजमध्ये 131 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-320, अंबाजोगाई-215, आष्टी-133, धारुर-84, गेवराई-200, केज-131, माजलगाव-52, परळी-119, पाटोदा-75, शिरुर-85, वडवणी-56 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हजाराच्या आत असणारी आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून हजाराचा टप्पा पार ओलांडत आहे. सध्याची राज्याची परिस्थिती पाहता राज्य शासन लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 985 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 63 हजार 309 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर तितक्याच कालावधीत 61 हजार 181 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आलाय. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 44 लाख 73 हजार 394 एवढी झालीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!