लातूर शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण…

लातूरः दि.७ (प्रतिनिधी)- महाविद्यालयात जाते म्हणून गेलेली मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत अपहरणाची (Kidnapping) शक्यता वर्तवली असून याबाबत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, लातूर (Latur) शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाते म्हणून सकाळी आपली ॲक्टीवा गाडी घेवून घरातून बाहेर पडली. दुपारी ३ वाजता परत येणारी आपली मुलगी परत आली नसल्याने तिचा शोध घेत मैत्रिणीकडे विचारपूस करण्यात आली. मात्र आज ती महाविद्यालयातच आली नसल्याचे कळाले. यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरुध्द अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास लातूर (Latur) पोलिस (Police) करत आहेत.