आताची सर्वात मोठी बातमी… नगरपालिका निवडणूका स्थगित.

52 / 100

मुंबई दि.14 जुलै – आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नगरपालिका निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राज्यात 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्या होत्या. राज्यातील 17 जिल्ह्यातील 77 तालुक्यात या निवडणूका होणार होत्या. यातच राज्यात सर्वदूर पावसाचा हाहाकार सुरु झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वीच निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. कालच बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून परिस्थितीचा अहवाल दिला होता.

राज्य शासनही निवडणूक घेण्यास अनुकूल नव्हते. राज्यातील जाहिर झालेल्या निवडणूकीमुळे अनेकांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका घेवू नये अशी मागणीही केली होती. आज राज्यमंत्री मंडळातही यावर चर्चा झाल्याचे कळते. यात आता राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या नगरपालिकेच्या निवडणूका स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकृत बातमी थोड्याच वेळात…..
Biggest news now… Postponement of municipal elections.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!