आजही जिल्ह्यात मोठी संख्या; प्रशासन रस्त्यावर

बीड दि.19 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4242 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1121 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3121 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्हाभर कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

आज त्रेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 161 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 212, आष्टी तालुक्यात 198 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 57 तर केजमध्ये 87 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-161, अंबाजोगाई-212, आष्टी-198, धारुर-57, गेवराई-101, केज-87, माजलगाव-64, परळी-125, पाटोदा-51, शिरुर-37, वडवणी-28 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा उद्रेक बीड जिल्ह्यात  वाढला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. सध्या लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणीसाठी आजपासून बदल करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते, मटन चिकन व बेकरीच्या दुकांनाना सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन रस्त्यावर उतरल्याचे ठिकठिकाणी दिसुन आले.

दरम्यान, राज्यात 24 तासांत 68 हजार 631 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून 503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 654 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. तर मुंबईत काल 8 हजार 479 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 53 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!