कोरोंना विशेष

आज पॉझिटीव्ह संख्या वाढली …. पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) धारुर तालुक्यातील कोरोना (Corona) बाधितांची संख्या आज ११ ने वाढली आहे. तालुक्यात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या काही दिवसांपासून एक अंकी होती. ती आज दोन अंकात आली आहे. काल पाठवलेल्या ८ स्वॅब (swab) पैकी ४ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ४५ ॲन्टीजन तपासणीत ७ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.

काल तालूक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५०० झाली होती. गेल्या काही दिवसात कमी झालेली पॉझिटीव्ह संख्या आज वाढली आहे. ४५ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ७ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या आठ स्वॅब (swab) नमुन्यापैकी चार पॉझिटीव्ह आली आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांत शहरातील ३ माजलगाव तालुक्यातील दोघांचा, पहाडी पारगाव एक, आसोला एक व तेलगाव येथील ४ जनांचा समावेश आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ६० वर्षीय महिला, पहाडी पारगाव, ता.धारुर

२. १२ वर्षीय पुरुष, सुल्तानपुर, ता.माजलगाव .

३. २ वर्षीय मुलगा, सुल्तानपुर, ता.माजलगाव

४. ६ वर्षीय मुलगी, तेलगाव, ता.धारुर

५. ११ वर्षीय मुलगा, तेलगाव, ता.धारुर

६. ६० वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर

७. ६५ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

८. ४१ वर्षीय पुरुष, गायकवाड गल्ली, धारुर

९. १८ वर्षीय स्त्री, केज रोड, धारुर

१०. ४० वर्षीय स्त्री, केज रोड, धारुर

११. ३० वर्षीय पुरुष, आसोला, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!