“औरंगाबाद” ऐवजी आता “छत्रपती संभाजी महाराज” नामकरण….

मुंबईः दि.७- औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वादंग उठलेले असताना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (Chatrapati Sambhaji Maharaj) असे करण्याच्या मंत्रीमडंळाच्या निर्णयावर नागरी उडयन मंत्रालयाने तात्काळ अधिसुचना काढावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी केली आहे.
सध्या भाजपा-मनसे-शिवसेना व काँग्रेस मध्ये औरंगाबाद नामांतरावरुन चांगलीच जुंपलेली आहे. शहराच्या नामांतराला विरोध करणारे आणि समर्थक आमनेसामने येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मात्र आज नामांतर ऐवजी विमानतळाच्या नामकरणाचा विषय चर्चेत आला आहे. राज्य मंत्रीमंडळाने “औरंगाबाद” (Aurangabad) विमानतळाचे नाव “छत्रपती संभाजी महाराज” (Chatrapati Sambhaji Maharaj) विमानतळ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव केंद्रीय विमान उडयन मंत्रालयात पाठवण्यात आला असून यावर केंद्राने तात्काळ अधिसुचना काढावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी केली आहे.