बीड जिल्ह्यातील रविवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी .

बीड दि.21 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 601 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 10 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 591 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सहा तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-3, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात वाढलेली आहे. दहाच्या आत असलेली संख्या गुरुवारी 17, शुक्रवारी 13, शनिवारी 13 तर आज 10 वर आली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शनिवारी 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची एकुण संख्या 2820 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 80 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 833 कोरोना रूग्णांचं (Corona Positive) निदान झालं आहे. तर 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 2271 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 74 हजार 952 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.67 टक्के इतका झाला आहे.