माझं गाव

चळवळीतील कार्यकर्ते विजय लोखंडे यांचे निधन; धारुर शहरात शोककळा.

51 / 100

किल्लेधारूर दि.26 मार्च – चळवळीतील कार्यकर्ते तथा मानवी हक्क अभियानचे माजी धारूर तालुका अध्यक्ष विजय लोखंडे यांचे दि.25 शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने ( heart attack ) निधन झाले.

धारुर (Dharur) तालुक्यात मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून चळवळ उभी करणारे उमदा तरुण अशी विजय लोखंडे यांची ओळख होती. समाजातील अन्यायाला वाचा फोडणारा व सतत सामाजिक कामात अग्रेसर राहण्याचा त्यांचा पिंड होता. दि.25 शनिवारी रात्री नऊच्या सुमारास छातीत हलक्या वेदना होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच हृदयविकाराचा तीव्र धक्का ( heart attack ) आल्याने यातच त्यांचे निधन झाल्याचे कळते.

एक चळवळीतील कार्यकर्ता ( Movement activist ) हरवल्याची प्रतिक्रिया येत आहेत. समाज माध्यमातून लोखंडे यांच्या परिचित व प्रेम करणाऱ्या चाहत्यांतून मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली व्यक्त होत आहे. विजय लोखंडे ( Vijay Lokhande ) यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. लोखंडे परिवाराच्या दुःखात बीड24 न्यूज परिवार सहभागी आहे.
( Movement activist Vijay Lokhande passes away; Mourning in Dharur town. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!