पदवीधर मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढणार;

बीडः दि.९- आज भाजपाच्या वतीने औरंगाबाद Aurangabad विभाग पदवीधर मतदारसंघात graduate constituency शिरीष बोराळकर Shirish Boralkar यांची उमेदवारी जाहीर करताच बीडचे Beed भाजपाचे BJP माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे Ramesh Pokale यांनी बंडखोरीचा इशारा दिला असून पोकळे यांचे बंड भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते.

औरंगाबाद Aurangabad विभाग पदवीधर मतदारसंघासाठी graduate constituency १२ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. या निवडणूकीत भाजपाकडून शिरीष बोराळकर Shirish Boralkar यांच्यासह रमेश पोकळे व प्रविण घुगे यांच्या नावाची चर्चा होती. तर माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांतूनही उमेदवारीची मागणी केली जात होती. आज भाजपाच्या BJP वतीने यावर पडदा टाकत बोराळकर यांची उमेदवारी जाहिर केली. मात्र मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासुन सतत पदवीधरांसाठी काम करणारे रमेश पोकळे Ramesh Pokale या निर्णयामुळे नाराज झाले असुन त्यांनी आपली नाराजी सोशल मेडियाच्या माध्यमातून उघड केली आहे. त्यांनी सरळ बंडखोरीचा इशारा दिला असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. पोकळे हे माजी मंत्री पंकजाताई मुंडे Pankajatai Munde यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रमेश पोकळे Ramesh Pokale हे बीड Beed भाजपाचे BJP माजी जिल्हाध्यक्ष तर विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!