राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त कोविड योध्द्यांचा सन्मान

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांच्या वतीने तालुक्यातील आरोग्य प्रशासनातील सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करत सॕनिटायझर वाटप करण्यात आले.

आज दि.१ जूलै बुधवार रोजी देशात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी तालुका आरोग्य प्रशासनात कार्यरत असणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, युवानेते सुधीर शिनगारे, नगरसेवक संजित कोमटवार यांची उपस्थिती होती. यावेळी माधव निर्मळ यांनी जागतिक महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिलेली सेवा म्हणजे प्रत्यक्ष देवस्वरुप असल्याचे सांगितले. महाजन यांनी गेल्या चार महिन्यात स्वतः अनुभवलेले डॉक्टर या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे, धारुर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, भोगलवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती लगड, डॉ. परवेश शेख, डॉ. अमोल दुबे, डॉ. पुजदेकर, आरोग्य कर्मचारी राजाभाऊ चाटे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शेकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सय्यद शाकेर यांनी तर आभार सुधीर शिनगारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी सॕनिटायझर देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, मुजाहेद मोमोन, सय्यद रज्जाक, ॲड. परमेश्वर शिनगारे, विश्वास शिनगारे, देवा लोंढे, जैनूल काझी आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!