भारताच्या ‘शेजारी’ या देशात दहा दिवसांचा लॉकडाऊन; तिसरी लाट थांबवण्यासाठी निर्णय.

कोलंबो दि.21 अॉगस्ट – कोरोना व्हायरसची (Corona virus) तिसरी लाट (Third wave) थांबवण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून 10 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे (lockdown) आदेश श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटभाया राजपक्षे (Gotabhaya Rajapakse) यांनी दिले आहेत. डॉक्टरांचा वाढता दबाव पाहता हा निर्णय श्रीलंका (Sri Lanka) सरकारने घेतला आहे.
(Ten-day lockdown in India’s ‘neighbors’; The decision to stop the third wave.)
नॅशनल ऑपरेशन्स सेंटर फॉर कोविड प्रिव्हेन्शनने सांगितले की लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून ते 30 ऑगस्ट रोजी सकाळी 4 पर्यंत सुरू होईल. कोविड प्रिव्हेन्शन फॉर नॅशनल ऑपरेशन्स सेंटरचे प्रमुख तथा लष्करप्रमुख (Army chief) जनरल शवेंद्र सिल्वा म्हणाले की क्वारंटाईन कर्फ्यू (Quarantine curfew) रात्री 10 ते 30 ऑगस्ट पर्यंत राहील. देश बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्यामुळे यापूर्वी राजपक्षे यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता.
दरम्यान, श्रीलंकेत गुरुवारी कोरोना विषाणूमुळे 186 लोकांचा मृत्यू झाला. तर 3800 नवीन रुग्ण सापडली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, श्रीलंकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 6,790 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 373,165 लोकांना संसर्ग (Corona infection) झाला आहे.
आरोग्य तज्ञांचे म्हणण्यानूसार, राजधानी कोलंबोसह (Colombo) पश्चिम प्रांत सर्वात जास्त प्रभावित झाला आहे. कोलंबोमध्ये 75 टक्क्यांहून अधिक प्रकरणे वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हायरसची (Delta variant) आहेत. जूनच्या मध्यापासून देशात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. श्रीलंकेच्या 20 दशलक्षाहून अधिक लोकसंख्येपैकी केवळ 5 दशलक्ष लोकांना लसीचे (Corona vaccine) दोन डोस देण्यात आले आहेत.