बिबट्याने घेतला आणखी एका महिलेचा बळी… दिवसातील दुसरी घटना

आष्टीःदि.२९(प्रतिनिधी)- आष्टी Ashti तालुक्यात आज सकाळी एका महिलेवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा दुसरी घटना घडली असून बिबट्याने Leopard एका ४५ वर्षीय महिलेला ठार केले आहे. सुरेखा निळकंठ भोसले असे मृत महिलेचे नाव आहे.

सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता पारगाव बोराडे येथे घडलेल्या घटनेत बिबट्याचा तपास सुरु असताना हा दुसरा प्रकार घडला आहे. सुरडी व किन्हीतील बळी नंतर हा बिबट्याचा तिसरा बळी असुन आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात चार जन जखमी झाले आहेत. संपूर्ण आष्टी Ashti तालुक्यात भितीचे वातावरण असून मोठी यंत्रणा शोधकार्यात असतानाही बिबट Leopard चकवा देत आहे. याभागात बिबट्यांची संख्या एका पेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!