धक्कादायक; परळीत एसबीआय बँकेचे पाच कर्मचारी पॉझिटीव्ह; जिल्ह्यात ९

बीडः परळी एसबीआयच्या पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने काल त्यांचे स्वॕब घेण्यात आले होते. त्याच्या स्वॕब हे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. तर आज २५० पैकी जिल्ह्यात ९ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. यात बीड २, अंबेजोगाई व शिरुरचे प्रत्येकी एक व परळीचे पाच असे नऊ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली.
परळीत ही कोरोनाने शिरकाव केल्याने आता अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्या स्वॕबचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेतले होते घेऊन अंबाजोगाई येथील Covid-19 सेंटरला पाठवण्यात आले होते ते अहवाल आता नुकताच प्राप्त झाला असून पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने खळबळ उडाली आहे. एसबीआय बँकेची शाखा ही तालुक्यातील एक मोठी व्यवहार असणारी बँक आहे. यामुळे कर्मचाऱ्या पासून अनेक लोकांचा संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे हे कोरोना पॉझिटिव नागरिकांकडून अजून किती लोकांना संसर्ग झाला असेल हे आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.
आजचे अहवाल
आज 09 पॉझिटिव्ह
*आजचे स्वॅब – 251*
*निगेटिव्ह – 242*
*अनिर्णित – 0*
*05* -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष
*01*-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
*01*-अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला
*01*-डीपी रोड,बीड-45वर्षीय महिला
*01*- बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)