जिल्हा बँक निवडणूकीतून पंकजा मुंडेंची माघार; धनंजय मुंडेवर केला आरोप

बीड दि.19 मार्च – बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीतून भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माघार घेतली असून पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
(Pankaja Munde withdraws from District Bank elections; Allegations leveled against Dhananjay Munde)
सुरुवातीपासूनच बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (Beed District Bank election) वादग्रस्त ठरत आहे. बँकेच्या 8 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सेवा सहकारी संस्थेच्या 11 जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयातही अपयश आले आहे. मतदान अवघ्या काही तासावर आले असताना आज शुक्रवार दि.19 मार्च रोजी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे जाहिर केले.
बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत (Beed District Bank election) जे काही होत आहे ते जिल्ह्याने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांचे हित पाहिले आहे. मात्र सत्तेचा गैरवापर होत आहे. सहकार मंत्र्यावर सत्तेचा दबाव आणून अन्याय होत आहे. आमची ताकद जास्त असताना प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. संचालक मंडळच होणार नसेल तर निवडणूक कशाला म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट आरोप केला. निवडणूक झाली तर पुर्ण जागांवर व्हायला पाहिजे म्हणत निवडणूकीतून माघार घेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र मस्के, भिमसेन धोंडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा आदींची उपस्थिती होती. अवघ्या काही तासावर निवडणूक आली असताना पंकजा मुंडे यांनी घेतलेली भुमिका भाजपाचा (BJP) सपशेल पराभव समजला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रतिष्ठेची करत दोन दिवसांपासून जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरु असल्याचे दिसुन येत आहे.