घात-अपघात

केज जवळ भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ?

केज दि.2 जून – बीड जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना केज तालुक्यात घडली असून कार व रिक्षाची धडक होवून मोठी जिवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात (Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघाताची शृंखला सुरु आहे. अंबाजोगाई लातूर रस्त्यावर घडलेल्या मोठ्या अपघातानंतर आता केज अंबाजोगाई रस्त्यावर आज गुरुवारी दुपारी मोठा भीषण अपघात झाल्याची माहिती येत आहे. या अपघातात किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

केज तालुक्यातील होळ ते चंदन सावरगाव दरम्यान कार व रिक्षाचा अपघात झाला आहे. सदर अपघाताची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र अपघात येवढा भीषण आहे की धडक झालेली दोन्ही वाहने चक्काचूर झाली आहेत. रिक्षाचे दोन तुकडे होवून खड्ड्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळाकडे युसुफ वडगाव पोलिसांनी धाव घेतल्याचे कळते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

( Terrible accident near Kaij; Six killed? )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!