माजलगाव धारुर रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार.

माजलगाव दि.21 जानेवारी – माजलगाव धारुर रोडवरून तेलगाव कडून माजलगावला येणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना रात्री (दि.20) गुरुवार रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लहामेवाडी पाटी समोर घडली आहे.
(Terrible accident on Dharur Road; Two youths killed in unidentified vehicle crash)
या बाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार माजलगाव धारुर (Majalgoan Dharur) रोडवरून तेलगाव कडून मोटारसायकल क्रमांक एम एच 44 डब्ल्यू 9668 वरून राजेंद्र सिंह बन्सीलाल राजपुरे (वय 26 वर्षे) रा. चाकरण, राजस्थान व मनिषकुमार सोनी (वय 22 वर्षे) रा. काडवा, राजस्थान काडवा हे येत असताना अज्ञात वाहने धडक देवुन उडवले.
या अपघातात हे दोघेही जागीच ठार झाले. ही घटना दि.20 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघात येवढा भीषण होता की दोघे तरुण जागीच गतप्राण झाले. अपघात (Accident) घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माजलगाव ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस ए. पी. आय. (API) जजवाळ, सहायक पो. उपनिरीक्षक सुनिल आईटवार यांनी घटनास्थळी जावून मयत दोघांना ही ग्रामीण रूग्णालयात आणले असुन पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
माजलगाव ते केजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी (National Highway) या सिमेंट रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. रस्त्यावर मोठी वर्दळ असून दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावर धारुर घाट (Dharur Ghat) असून सततच्या अपघातामुळे या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यामुळे या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन असणे गरजेचे झाले आहे.