धारुर तालुक्यात बिबट्याची दहशत… वनविभागाकडून पाहणी.

किल्लेधारूर दि.16 नोव्हेंबर – तालुक्यातील मौजे कान्हापुर येथील ग्रामस्थांनी बिबट्या (Leopard) सदृश्य वन्यप्राणी पाहिल्याने एकच दहशत उडाली. याची माहिती मिळताच धारुर वनपरिक्षेत्र विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी परिसराची पाहणी केली. कालच गांवदरा येथे गायीच्या वासराचा अज्ञात वन्यप्राण्याने फडशा पाडल्याची घटना घडली.
(Terror of leopard in Dharur taluka … Inspection by Forest Department.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर (Dharur) तालुक्यातील कान्नापुर गावाच्या शिवारात काही ग्रामस्थांनी बिबट्या पाहिल्याची माहिती दिली. यावरुन गावच्या सरपंचानी भ्रमणध्वणीवरुन (Mobile) धारुर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क करुन सोमवारी (दि.15) रोजी बिबट्या सदृश्य वन्य प्राणी दिसुन आल्याचे रात्री 10 वाजता कळविले.
या माहितीवरुन आज दि.16 मंगळवार रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यु.एच.चिकटे व वनपरिमंडळ अधिकारी एस.जी.वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7.30 वाजता मौजे कान्हापुर ता.धारुर येथे सदर मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी मोहखेडचे वनरक्षक एम.एम.सावंत व वनकर्मचारी एस.डी.पारवे, बी.व्ही.राऊत, ए,व्ही.वाल्हे, के.एन.सोळंके, शाम गायसमुद्रे यांचे पथक दाखल झाले.
मिळालेल्या माहिती प्रमाणे आशोक बाबुराव देशमुख यांच्या मालकीच्या शेतात स.नं.356 मध्ये जाऊन त्यांनी दाखविलेल्या क्षेत्राची पहाणी केली. मात्र या पाहणीत तेथे कोणत्याही वन्यप्राण्याच्या पाउलखुणा दिसुन आल्या नाहीत. सदरील प्रकारावर हा प्राणी तरस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामस्थांनी भिती बाळगू नये असे आवाहन वन कर्मचाऱ्यांनी केले आहे.