‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली; सोशल मेडीयामुळे पोलिसांनी लावला 24 तासात लागला छडा.

परळी दि.5 डिसेंबर – दोन दिवसांपुर्वी बीड जिल्हा पोलिस (Beed Police) प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात सोशल मेडियातून (Social media) एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले होते.

(‘That’ body was identified; Police cracked down on social media within 24 hours.)

यानंतर 24 तासांच्या आत सदरील मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचा पैशाच्या देवाण घेवाणीतून गळा चिरुन खुन (Murder) झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बळीराम देवकते (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तरुणाची मिसिंगची तक्रार (complaint) देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी (Parli) तालुक्यातील वांगी तलावात दोन दिवसांपूर्वी एका तरूणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. धारदार शस्त्राने खून करून मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाची ओळख पटवून तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलिसांनी अवघ्या 24 तासात खुनाचा उलगडा करून मृतदेहाची ओळख पटवीली. मेंढ्या खरेदी-विक्री व्यवहारातून व पैशाच्या देवाण-घेवाणीवरून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सिरसाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!