शैक्षणिक

जुळ्या बहिणींची किमया; दिसायला हुबेहूब गुणांतही हुबेहूब…

लातूर दि.18 जुन – अंकिता आणि निकिता भरत श्रीरामे या दोन जुळ्या मुली (twin sisters) आहेत. शुक्रवारी दहावीचा निकाल (Tenth Results) जाहीर झाल्यानंतर श्रीरामे कुटुंबीय आनंदित झाले. आश्चर्य म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या अंकिता व निकिता या दोघीनी निकालाच्या दिवशी 87.60 टक्के एकसारखे गुण मिळवून सर्वांनाच आचंबित केले.

कंधार तालुक्यातील कुरळा येथील भरत श्रीरामे चाकूर येथे खाजगी नोकरी करतात. त्यांना अंकिता आणि निकिता या जुळ्या मुली आहेत. या दोघी बहिणी दिसायला हुबेहूब असून यामुळे शेजारी राहणाऱ्यासह नातेवाईक व जवळचे परिचितही गोंधळून जातात. हुबेहूब दिसणाऱ्या बहिणीं अभ्यासातही हुबेहूब आहेत. यंदा दोघींनी वेगवेगळ्या शाळेत दहावीची परीक्षा (Tenth Exam) दिली होती.

यापैकी अंकिता कुरळा गावातील शिवाजी विद्यालयात दहावीला होती. ती आजी-आजोबांकडे राहते. तर आईकडे राहणारी निकिता भाई किशनराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना सारखेच 438 गुण मिळाले. आता पुढील शिक्षण त्या दोघीही लातूर (Latur) येथे एकत्रित घेणार आहेत. दोघींचेही मुख्याध्यापिका सुनीता कोयले, शिक्षिका वर्षा सांगवीकर यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवारातून कौतुक होत आहे.

( The alchemy of twin sisters; It looks like a sack that encloses with a drawstring. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!