कोरोंना विशेष

धारुरला २ पॉझिटीव्ह; जिल्ह्यात आजही भडका

बीडः दि.६ आगस्ट- काल धारुरहून पाठवलेली ३४ अहवाला पैकी शहरातील २ सहवासित पॉझिटीव्ह आली आहेत. अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या धारुरच्या एका रुग्णाचे आज निधन झाले आहे. जिल्ह्यात आजही कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या आजही शंभरी पार करण्याची शक्यता असून काही वेळात अधिकृत माहिती उपलब्ध होईल.

शहरात गेल्या पाच दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत आज दोनने वाढ झाली आहे. तालुक्यातील चारदरी येथे नवीन दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याच्या बातमी बाबत खुलासा झाला असून एक चारदरी येथील रुग्ण दिल्ली येथे पॉझिटीव्ह येवून दिल्ली येथे उपचार घेत आहे तर एका हरियाणा येथील रुग्णाची नोंद पोर्टल वर चुकून झालेली आहे. अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या धारुरच्या उदयनगर भागातील एका रुग्णाचे आज सांयकाळी निधन झाले. आज आलेले अहवाल हे मठ गल्लीतील पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित आहेत. यात २८ वर्षीय व ५९ वर्षीय महिलांचा समावेश आहे. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठी असून शंभर पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण येण्याची शक्यता आहे. आज धारुर शहरातील ६१ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!