धारुर तालुक्यातील शिक्षकाची आत्महत्या; माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांनी संपवली जीवनयात्रा.

माजलगाव दि.24 फेब्रुवारी – माजलगाव तालुक्यातील राजेवाडी, राजेगाव व केसापुरी कॅम्प येथील तिघांनी नैराश्येच्या वेगवेगळ्या कारणांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात धारुर तालुक्यातील रहिवाशी एका तरुण शिक्षकाचा समावेश आहे.
( Teacher commits suicide in Dharur taluka; In Majalgaon taluka, three people completed their life journey on the same day. )
माजलगाव शहरा लगत असणाऱ्या केसापुरी येथे सुरेश रामकिसन बडे (वय 37 वर्षे ) राहणार गावंदरा तालुका धारूर (Dharur) येथील रहिवासी असलेले शिक्षक हे माजलगाव (Majalgoan) शहरालगत केसापुरी कॅम्प येथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून गुरुवार रोजी पहाटे तीन वाजता घरातील लोखंडी आडुला दोर लावुन गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बडे वय 58 वर्षे यांच्या निदर्शनास आली त्यांच्या खबरी वरून माजलगाव शहर पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कृष्णा बालासाहेब कोके (वय 19 वर्षे ) या युवकाने गळफास घेतला. अज्ञात कारणाने बुधवारी रात्री साडे आठ नऊच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्ट च्या साहह्याने स्वतःच्या राहत्या घरात आडूला गळफास लावून युवकाने आत्महत्या केली. अत्यंत कमी वयात युवकाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
तर तिसरी घटना माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे घडली. येथील रामचंद्र धुराजी गरड या (वय 40 वर्षीय) इसमाने एक जणा सोबत केलेल्या म्हशीच्या व्यवहारातील पैशाच्या सततच्या तगाद्याला कंटाळून राजेगाव शिवारातील बबन लालसिंग चव्हाण यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गुरूवार रोजी पहाटे 4 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .
या तीन घटनेने या तिन्ही गावात शोककळा पसरली आहे. या आत्महत्या प्रकरणी कार्यक्रम ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव , दिंद्रुड पोलीस स्टेशन व माजलगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश रामकिसन बडे या तरुण शिक्षकाने आत्महत्या केल्याचे वृत्त धारुर तालुक्यातील गांवदरा गावात कळताच शोककळा पसरली.