मोठी बातमी… राज्य सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रमांना नियमावलीसह परवानगी.

मुंबई दि.12 अॉक्टोंबर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. सध्या कोरोना संसर्गाचे (Corona infection) प्रमाण आटोक्यात असल्याने राज्य सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रमांना नियमावलीसह (guidelines) परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या सिनेमागृहांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
(The big news … permission from the state government for public events with regulations.)
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियमावली –
कार्यक्रमाला प्रवेश देतेवेळी शरीराचं तापमान तपासणं बंधनकारक, बंदिस्त सभागृहात एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी, कार्यक्रमावेळी 6 फुटांचे सामाजिक अंतर राखणे बंधनकारक, कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक सर्वांना मास्क घालणे बंधनकारक, बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण (vacccination) पूर्ण झालेले असणे बंधनकारक,
खुल्या जागेत कार्यक्रम घेताना 6 फुटांवर खुणा करून बसण्याची व्यवस्था करावी, गर्दी नियमावलीसाठी आयोजकाकडे सुरक्षा व्यवस्था असावी, खुल्या जागेत कार्यक्रम असताना खाद्यपदार्थ, पेय विक्री करण्यास बंदी, रंगभूषाकारांनी कार्यक्रमात पीपीई किट (PPE Kit) परिधान करणे बंधनकारक, कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल. असे नियम लावण्यात आले आहेत. आयोजकांनी वरील सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
सिनेमागृहांसाठी नियमावली –
सिनेमागृहं (Theaters), मल्टिप्लेक्समध्ये (Multiplex) काम करणाऱ्या प्रत्येकाचे पूर्ण लसीकरण गरजेचे आहे, गर्दी टाळण्यासाठी वेळेची आधीच माहिती देणे बंधनकारक, तिकीट नोंदणी, फूड कोर्टवर ऑनलाईन पेमेंटची सुविधा गरजेची, तिकीट असणाऱ्यांनाच सिनेमागृहात परिसरात प्रवेश, पार्किंगमध्ये गर्दी जमणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि समाजिक अंतर राखणं बंधनकारक, सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक, अशी नियमावली आहे.