क्राईम न्यूज… विवाहितेची सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा नोंद.

गेवराई दि.27 जुलै – गेवराई तालुक्यातील शेकटा येथील अवघे आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीनी अतोनात छळ केला. तसेच विवाहितेवर गर्भपात (Abortion) करण्यासाठीही दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. छळ असह्य झाल्याने अखेर त्या विवाहितेने विषारी औषध (Poison) प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली.

(Crime News … Suicide of a married woman after getting fed up with her father-in-law’s harassment; Crime recorded against three including husband.)

मोनिका भीमाशंकर भारती असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिकाचे वडील दत्ता राजाराम गिरी यांच्या फिर्यादीनुसार पतीसह दिर, जाऊ आणि सासूवर गेवराई पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिकाचा विवाह आठ महिन्यापूर्वी भीमाशंकर नारायण भारती याच्यासोबत झाला होता.

सुरुवातीचे चार-पाच महिने चांगले गेल्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन ये अशी मागणी करत पती भीमाशंकर, दिर राहुल, जाऊ मीनाक्षी आणि सासू संजीवनी या चौघांनी मोनिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ (harassment) सुरु केला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत असे मोनिकाच्या वडिलांनी सांगितले. मोनिका गर्भवती (Pregnant) राहिली असता तिच्या पतीने आत्ताच मूल नको म्हणून गर्भपातासाठी (Abortion) तिच्यावर दबाव टाकला.

अखेर सततच्या छळास कंटाळलेल्या चार महिन्याच्या गर्भवती (Pregnant) मोनिकाने विषारी औषध (Posion) प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. मयत मोनिकाचे वडील दत्ता राजाराम गिरी यांच्या फिर्यादीवरुन मोनिकाचा पती, दिर, जाऊ आणि सासूवर गेवराई पोलीस (Police) ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!