घाटात आढळला लिंबागणेशच्या तरुणाचा मृतदेह; घात की अपघात….?

नेकनूर दि.29 जून – मांजरसुंबा घाटात (Manjarsumbha Ghat) बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी दि.29 रोजी मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस (Police) दाखल झाले आहेत.
(The body of a young man was found in the ghat; Accident ….?)

निलेश ढास (वय 27) रा.लिंबागणेश ता.बीड या तरुणाचा मांजरसुंबा घाटात (Manjarsumbha Ghat) मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात (Accident) आहे की, घातपात हे निष्पन्न झाले नसून मयत तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम आहे, मृतदेह बुलेट गाडीवर पडलेला होता. यामुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी नेकनूर पोलीस (Police) स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे , बीड ग्रामीणचे उपनिरीक्षक रोटे यांच्या सह दीपक खांडेकर, अमोल नवले, क्षिरसागर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हा अपघात आहे की, घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेह बुलेट गाडीवर पडलेल्या अवस्थेत असल्याने संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!