धारुरच्या सुपूत्राची चमकदार कामगिरी; लातूरच्या ‘भुईसमुद्रा’च्या खुनातील आरोपींना ठोकल्या बेड्या.

लातूर दि.18 जानेवारी – लातूर (Latur) शहरातील एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्याच्या हद्दीतील मौजे भुईसमुद्रगा (ता.लातुर) येथे दि.19 डिसेंबर,2021 रोजी रात्री इसम नामे ऋषीकेश रामकिशन पवार (वय 29 वर्ष) यांच्या शेतातील आखाड्यामध्ये जळुन मयत झाल्याची खबरेवरुन पो.स्टे.ला अ.म.नं. 284/2021 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
(The brilliant performance of Dharur’s son; The accused in the murder of ‘Bhuisamudra’ were handcuffed.)
सदरच्या घटनास्थळाला अप्पर पोलीस अधिक्षक अनुराज जैन, शहर पोलीस उपाधिक्षक जितेंद्र जगदाळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) संजीवन मिरकले यांनी भेट दिली. या खूनाच्या तपासात धारुर (Dharur) जि.बीडचे सुपूत्र पोलिस उपनिरिक्षक संदीप कराड यांनी चमकदार कामगिरी केली.
मयत हा घटनेच्या दिवशी कोणासोबत होता या दृष्टीने पोलीसांनी (Police) बारकाईने तपास केला. त्याबाबत कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन आला नाही. मयत हा आगीमध्ये जळून खाक झाल्याने सदरचा खुन किंवा अपघात याबाबत तर्कवितर्क चर्चा ग्रामस्थामध्ये होती.
एमआयडीसी पोलीसांनी अत्यंत संयमाने व तांत्रिक दृष्या तपास करुन पुरावे गोळा केले व प्राप्त गोपनिय माहितीचे संकलन करुन तसेच सीसीटीव्ही फुटेज , मोबाईल चॅटींग, मोबाईल लोकेशन, कॉल्स या बाजुने बारकाईने तपास करुन सदरचा मयत ऋषीकेश रामकिशन पवार याचा खुन (Murder) झाल्याचा उलगडा झाला.
दि.19 डिसेंबर 2021 रोजी मयत ऋषीकेश रामकिशन पवार याचे शेतातील आखाडयावर गावातील त्याचा मेहुणा रणजीत विजयकुमार देशमुख व चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार हे दारु पिऊन मटनाचे जेवण केल्यानंतर आरोपी गोविंद पवार यांने मयत ऋषीकेश यास तु लई माजलास का ? तु माझे भावजयीला मोबाईलवर का बोलतोस ? असे म्हणुन वादावादी करुन आरोपी गोविंद नागोराव पवार याने आखाड्यावरील दाताळाने (शेती अवजार) मयताचे डोक्यात मारले.
मयत ऋषीकेश हा बेशुध्द पडल्यानंतर त्यास गोविंद पवार व रणजित देशमुख यांने बाजेवर झोपवुन त्यावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व पायी घराकडे गेले. असे सदर गुन्हयातील आरोपीने कबुली दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा उलगडा पोलीस अधिक्षक (Superintendent of Police) निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अनुराज जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कराड, पो.हे.कॉ. बेल्लाळे, पोना राजपुत , पो.ना. ओगले, पोलिस नाईक दरेकर , पोलिस नाईक वायगावकर , पो.ना. मालवदे , पोलिस शिपाई जाधव यांनी अत्यंत कसुन तपास करुन व गुप्त माहिती काढून गुन्हा उघडकीस आणला आहे .