अत्याचाराची शृंखला सुरुच; फोनवर बोलल्यामुळे महिलेला अमानुष मारहाण.

भोपाळ दि.04 जुलै – दोन दिवसांपुर्वी मुंबईत छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीसह दोन तरुणांना जमावाने मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली. काल मध्य प्रदेशमध्येच अलिराजपूर जिल्ह्यात एक विवाहित महिला सासरी न सांगता मामाच्या गावाला गेल्यामुळे झाडाला टांगून मारल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा मध्य प्रदेशच्याच (Madhya Pradesh) धार (Dhar) मधून दुसरी घटना समोर आली आहे. फोनवर बोलत असल्याच्या कारणाने तीन युवकांनी एका महिलेस अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

(The chain of atrocities continues; Inhuman beating of a woman for talking on the phone.)

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. समाजातील अनेक भागांमध्ये अजूनही महिलांना त्यांच्या मनाप्रमाणं जगण्याचा किंवा आवडी जोपासण्याचा हक्क दिला जात नाही. हा त्यांचा हक्क नसून गुन्हा असल्याचं अनेकांचं मत असतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की नुकताच समोर आलेला धक्कादायक व्हिडिओ देखील याचंच एक उदाहरण आहे. या व्हिडिओत काही युवक एका महिलेला अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ संदीप सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) शेअर केला आहे.

या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये (Caption) त्यांनी लिहिलं आहे, की ‘फोनवर बोलल्याची शिक्षा! हा व्हिडिओ कोणत्या तालिबानी परिसरातील नाही तर मध्य प्रदेशच्या धार (Dhar) येथील आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या भयंकर गुन्ह्यासाठी आरोपींना काहीही शिक्षा मिळालेली नाही. हे आरोपी केवळ पोलीस ठाण्यात उपस्थित राहून परत गेले आहेत. पोलिसांनी (Police) त्यांच्याविरोधात किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना सोडून दिलं आहे. इतक्या भयंकर कृत्याची इतकी लहान शिक्षा?’

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की तीन युवक एका महिलेला अमानुष मारहाण करत आहेत. ते या महिलेला काठीसोबतच लाथेनंही मारत आहेत. अक्षरशः हातातील काठी तुटेपर्यंत त्यांनी या महिलेला मारहाण केली आहे. यासोबतच तिचे केस पकडून तिला ओढत नेलं आहे. या सर्व घटनेदरम्यान कोणीही या महिलेच्या मदतीसाठी समोर आलं नाही. आजूबाजूला इतरही अनेक लोक उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ते या महिलेची मदत करण्याऐवजी केवळ हे सगळं पाहात बसले आहेत. घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर अनेकांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!