महाराष्ट्र ठरला आशियातला सर्वात मोठा हॉटस्पॉट; राज्य शासनाने जाहिर केले नवे निर्बंध

मुंबई दि.19 मार्च – महाराष्ट्र (Maharashtra) सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात (Asia’s) सर्वात मोठा हॉटस्पॉट (Hotspot) ठरला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे (corona) रूग्ण नव्याने वाढण्यास सुरूवात झाल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्या ठेवण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
(Maharashtra becomes Asia’s largest hotspot; New restrictions announced by the state government)
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात २५ हजार पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत काही नव्या गाईडलाईन्स (New guidelines) जारी केल्या आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवा, असे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, नवीन सुचनात (New guidelines) नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र देशातच नव्हे तर आशियातील सर्वात मोठा हॉटस्पॉट
सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. फक्त मुंबई शहराने पाकिस्तान, बांग्लादेश, जपान, सौदी अरेबिया सारख्या देशांना मागे टाकले आहे. मागिल तीन दिवसात महाराष्ट्रात 75 हजार रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राची सध्याची कोरोनास्थिती (corona) अत्यंत स्फोटक असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा लॉकडाऊन बाबत सुचक इशारा दिला आहे. यातच आशियातील (Asia’s) सर्वात मोठा हॉटस्पॉट (Hotspot) म्हणून महाराष्ट्र समोर आला असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.