बीड जिल्ह्यात आजची कोरोना बाधितांची संख्या 1210; जिल्ह्याचा कोरोनांक वाढताच.

बीड दि.23 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 3971 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1210 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2761 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आज रात्री पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
(The current number of corona victims in Beed district is 1210; As the corona of the district increases.)
आज सत्तेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 227 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 234, आष्टी तालुक्यात 165 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 49 तर केजमध्ये 129 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-227, अंबाजोगाई-234, आष्टी-165, धारुर-49, गेवराई-87, केज-129, माजलगाव-57, परळी-107, पाटोदा-88, शिरुर-31, वडवणी-36 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा उद्रेक जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. राज्य सरकारने काल रात्री पासून नवीन निर्बंध जाहिर केले असून 1 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र या निर्बंधाचाही अनेकांकडून भंग होत असल्याचे दिसुन येत आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत 67 हजार 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 568 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 94 हजार 840 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 62 हजार 479 जणांचा मृत्यू झाला आहे.