बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी; वाचा शेतकरी व बैलाच्या अतूट नात्याची कहाणी…

बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी; वाचा शेतकरी व बैलाच्या अतूट नात्याची कहाणी…
यवतमाळ: दि.३१- यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा (Farmer) बैल (Bull) आजारपणात वारल्यानंतर अगदी कुटूंबातील सदस्यातील मृत्यू पश्चात करण्यात येणाऱ्या विधी प्रमाणे दशक्रीया विधीसह गाव जेवण देवून शेतकऱ्याचं आपल्या जनावरांवर लेकरांसारखं प्रेम कसं असतं ते पहायला मिळाले. शेती, शेतकरी (Farmer) आणि बैल (Bull) यांच्यात जिव्हाळ्याचे नाते यातून दिसुन आले असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील पिंप्रडवाडी येथील रहिवासी कैलास राऊत यांच्या बैलाचा 17 तारखेला मृत्यू झाला. कैलास राऊत हे अनेक वर्षांपासून दुसऱ्याची शेती बैलाच्या साहाय्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या सोबत मागील 15 वर्षांपासून काम करत असलेल्या बैलाचा आजारा मुळे मृत्यू झाला. यामुळे राऊत कुटुंबाला घरातील सदस्य गेल्या प्रमाणे दुःख झाले. घरातील सदस्य गेल्यासारखे या बैलाचे दशक्रिया विधी कुटूंबाने पार पाडले. बैलाची तेरवी करत विधिवत लोकांना जेवण दिले. 15 वर्षांपासून या बैलानं घर चालवायला मदत केली असून तो आमच्या घरातला सदस्य होता. त्याच्या जाण्यानं घरातला सदस्य गेल्यासारखं दुःख झालं आहे. त्यामुळं त्याला असा निरोप देत विधी केला असं कैलास राऊत यांनी सांगितलं.