घात अपघात

Accident or murder … रस्त्याच्या कडेला मृतदेह ; घात की अपघात.. चर्चेला उधाण.

67 / 100

केज दि.28 मार्च – Accident or murder … केज तालुक्यातील विडा परिसरात आज गुरुवारी (दि.28 मार्च ) सकाळी रस्त्याच्या कडेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या डोक्याला जबर मार लागून मेंदू बाहेर पडलेला दिसून येत होता. यामुळे हा घातपात की, अपघात अशा उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र मृतदेह आढळून आल्यामुळे विडा परिसरात खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील  केज ते विडा रस्त्यावर पिंपळगाव-विड्याच्या मध्ये रस्त्याच्या कडेला आज सकाळी अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती मिळणच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सदर घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. अद्याप पर्यंत सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पुढील तपास केज पोलिस करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!