डेल्टा प्लस व्हेरिएन्टने महाराष्ट्राची चिंता वाढवली; 66 नवे रुग्ण 5 मृत्यू, बीडचा एक.

मुंबई दि.14 अॉगस्ट – कोरोनाची दूसरी लाट ओसरत नाही तोच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या (Delta plus variant) वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या (Genome sequencing) तपासणीत राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएन्ट आढळत असल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(The Delta Plus variant raised concerns in Maharashtra; 66 new patients 5 deaths, one of Beed.)
गेल्या एका आठवड्यात राज्यातील डेल्टा प्लस प्रकारांचा आकडा 21 वरून 66 वर पोहोचला आहे. यातील काही प्रकरणे जून महिन्यातील आहेत. राज्य सर्विलांस अधिकारी डॉ.प्रदीप आवटे म्हणाले की घाबरण्यासारखे काहीच नाही. ज्यांना आधीच अनेक आजार आहेत, अशा प्रकरणांमध्ये डेल्टा प्लस प्रकारातील मृत्यूची प्रकरणे समोर येत आहेत. ते म्हणाले की हे समजणे महत्वाचे आहे की डेल्टा अजूनही सर्वात घातक प्रकार आहे. तो 80 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे आणि डेल्टा प्रकारांवर लस (Corona vaccine) प्रभावी आहेत.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लसच्या विषाणूबाबत (Virus) पडताळणी करण्यासाठी नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग पद्धतीने तपासणी केली जात आहे. त्यानुसार तपासणी केलेल्या एकूण नमुन्यांपैकी जवळपास 80 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएन्ट आढळत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 66 झाली असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 3 पुरुष आणि 2 महिला आहेत. मृतांमध्ये दोघे रत्नागिरीतील असून बीड, मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सर्व मृत हे 65 वर्षांवरील असून त्यांना अतिजोखमीचे आजार होते. तसेच मृतापैकी दोघांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते.