चालकाचे अतिधाडस आले अंगलट; एसटी बस वाहून गेली… एका प्रवाशाचा मृत्यू , दोघांना वाचवले.

उमरखेड दि.28 सप्टेंबर – उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस (ST Bus) वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.28) सकाळी साडे आठ वाजता समोर आला आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते. यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला दोघांना वाचवण्यात आले तर इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

(The driver’s bravery came to an end; The bus was swept away … One passenger died, two were rescued.)

सकाळी साडे आठच्या सुमारास उमरखेडवरुन हिरकणी ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे (heavy rains) दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. याच नाल्यावरून एसटीचालकाने ही बस नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. सदरील घटनेचा व्हिडीओ सोशल मेडीयात (social media) व्हायरल झाला आहे.

उमरखेड पुसद मार्गावरील दहागाव येथील नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी वाहत होते. अशातही एसटी चालकाने (Bus driver) बस पुढे नेली त्यामुळे ती पुराच्या पाण्यात बुडाली. बसमध्ये चालकासह सहा प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांना दोन प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे तर एका प्रवाशाचा मृत्य झाला आहे. इतर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

या घटनेनंतर तहसीलदार आणि बचाव पथक (Rescue squad) घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुराच्या पाण्यातून वाहने घेऊन न जाण्याचे आवाहन करण्यात आले असतानाही एसटी चालकाने अतिधाडस दाखवत बस पाण्यात नेली. मात्र नाल्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने बस पाण्यासोबत वाहून गेली आहे. यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ मदतकार्य सुरु केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!